दुचाकी चोरास 12 तासाच्या आत केले जेरबंद

महासंदेश : समर्थ पोलिसांनी दुचाकी चोरास 12 तासाच्या आत जेरबंद केले. त्याने दहा दिवसांपूर्वी येरवडा येथून आणखी एक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सराईत असून, त्याच्यावर वाहन चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.
मयुर मोतीराम राठोड (वय 23, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 12 ऑगस्ट रोजी दुचाकी चोरी झाल्याची तक्रार समर्थ पोलिसात दाखल झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी चोरी, वाहनचोरीच्य घटनांना आळा घालण्यासाठी तपासणी करत होते. त्यावेळी त्यावेळी एक व्यक्ती सार्वजनिक रस्त्यावर दुचाकीवरून आला. त्याच्या गाडीला चावी नव्हती. पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
दरम्यान ती गाडी चोरी झाली असून, त्याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मालधक्का चौक, आंबेडकर भवन, मंगळवार पेठ येथून गाडे चोरल्याची कबुली त्याने दिली. समर्थचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सुमित खुट्टे, सुनील हसबे, विठ्ठल चोरमले, नीलेश साबळे, महेश जाधव, सुभाष मोरे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, नितीन घोसाळकर, जितेंद्र पवार, श्याम सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.