अहमदनगरमहाराष्ट्र

दुचाकी – ट्रकच्या अपघातात महिलेचा मृत्यू

महासंदेश : दुचाकीला ट्रकचा धक्का लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अंकिता अतुल कुलकर्णी (वय ३९, रा. ड्रीम व्हिला सोसायटी, काळेपडळ, हडपसर) असे अपघातात प्राण गेलेल्या महिलेचे नाव आहे.

पुणे-सासवड रस्त्यावर तुकाईदर्शन चौकात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता कुलकर्णी या आज सकाळी आपली मुलगी अनन्या हिला कोचिंग क्लासला सोडण्यासाठी गोंधळेनगरला घेऊन जात होत्या.

सासवड रस्त्यावरील तुकाईदर्शन चौकातील शनिमंदिराजवळ त्या वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला सासवडकडून येणाऱ्या ट्रकचा धक्का लागला. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक जावून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रकचालक ट्रक बाजूला उभा करून पळून गेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चौकट
भेकराईनगर – गंगा चौक, तुकाईदर्शन चौक हा परिसर
अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. आजपर्यंत अनेक अपघात नेमके याठिकाणी झाले आहेत. वाहतूक नियंत्रण करणे किंवा वाहतूक सुरळीत राहील असा उपाय योजना येथे का केल्या जात नाहीत ? ,असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Back to top button