अहमदनगर

देव तारी त्याला कोण मारी !

तरुणांच्या प्रसंगावधानामुळे ‘त्याचे’ प्राण वाचले

अहमदनगर : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय काल एकाला आला. त्याचे झाले असे  फुल, हार, माळा देऊन राहुरी तालुक्यातील केसापूरकडे घरी परतत असताना केसापूर येथील प्रवरा नदीवरील के. टी. वेअर बंधाऱ्याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने  गणेश मोहन भगत  हे तोल जाऊन बंधाऱ्यात पडले.मात्र वेळीच त्यांना इतरानी पाहिल्याने दैव बलत्तर म्हणून भगत थोडक्यात बचावले.
ही घटना राहुरी तालुक्यातील केसापूर- उक्कलगाव बंधाऱ्यावर बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी उक्कलगाव येथील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी काही तरुण आले होते. त्यावेळी भगत अंदाज न आल्याने बंधाऱ्यात पडत असल्याचे तरुणांनी पाहिले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोहण्याऱ्या युवकांनी बंधाऱ्यात उड्या घेतल्या. काही अनर्थ घडण्याच्या आत तरुणांनी भगत यांना तातडीने बाहेर काढले.
राहुरी व श्रीरामपूर तालुक्याच्या मध्यावर असलेल्या प्रवरा नदीवरील केसापूर के. टी. वेअरला कठडे नसल्याने अपघात घडत आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या बंधाऱ्याला संरक्षक कठडे बसविण्याची वेळीवेळी मागणी केली असताना अद्यापही संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाही. राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा बंधारा आहे. केसापूर, आंबी, दवणगाव, बेलापूर, केशव गोविंद बन देवस्थान, राहुरीकडे जाणाऱ्यांसाठी हा जवळाचा रस्ता आहे. या बंधाऱ्याचा प्रवासी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक रस्त्याचा वापर करतात. या बंधाऱ्यावरुन नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत केसापूर बंधाऱ्याचा वापर जीवघेणा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button