देश-विदेश

देशात गेल्या २४ तासात आढळले २ लाख ११ हजार नवे करोनाबाधित

महासंदेश : करोनाने सर्वत्रच हाहाकार माजविला आहे. त्याच बरोबर मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात करोना संक्रमणामुळे ३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (गुरूवार) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ११ हजार ५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

तर देशात १२ लाख ८३ हजार १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात २४ लाख १९ हजार ९०७ बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत भारतात २ दोन ७३ लाख ६९ हजार ९३ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २ दोन ४६ लाख ३३ हजार ९५२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ३ लाख १५ हजार २३५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत  २० कोटी नागरिकांना लास देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button