अहमदनगर

दोन तोळ्याचे गंठण चोरीला

अहमदनगर : दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमाने हिसकावून तोडून नेले. सावेडी येथील पाईपलाईन रोडवरील बीएसएनएल ऑफिस जवळ रविवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी सविता गणेश शेलार (वय 41 रा. रामकृष्ण कॉलनी, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी या रविवारी दुपारी गुलमोहर रोड वरील ब्युटी पार्लर येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपून त्यांच्या दुचाकीवरून घराकडे जात असताना बीएसएनएल ऑफिस जवळ आल्या असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोन इसम आले. त्यांनी फिर्यादी यांच्या दुचाकी जवळून त्यांची दुचाकी वेग कमी करून चालवली व अचानक पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून चोरून नेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे फिर्यादी गोंधळ गेल्या. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. परंतु आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा होण्याअगोदरच दुचाकीस्वार रामकृष्ण कॉलनीच्या दिशेने निघून गेले. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Back to top button