अहमदनगर

धाकटी पंढरी समजल्या जाणार्‍या अरणगावला आषाढी एकादशी उत्साहात साजरी

महासंदेश : नगर तालुक्यातील अरणगाव येथे पुरातन काळातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरास धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला.
पहाटे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गोरख गहिले, छाया गहिले यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस दही-दुधाने स्नान घालून व काकडी आरती संपन्न झाली, तसेच विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ऋषिकेश जाधव, सुधाकर जाधव, हभप पंढरीनाथ  महाराज दळवी, देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश जाधव, आनंदा शेळके, मोहन नाथ, रामभाऊ शिंदे, शिवाजी पुंड, त्र्यंबक गाढवे, काशिनाथ गहिले, देशमुख, दत्तात्रेय पंडित, काशिनाथ गहिले, पोपट गहिले, सोमनाथ गहिले, पिंटू देशमुख, मोहन नाट, विश्‍वनाथ पाडळे, जगन्नाथ भटणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गोरख गहिले म्हणाले की, अरणगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खूप पुरातन असून, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे. दरवर्षी या मंदिरात आषाढी एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून यंदाचा उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना सर्वांनी केल्याचे ते म्हणाले.
हभप पंढरीनाथ महाराज दळवी म्हणाले की, श्री विठ्ठल वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. राज्यभरातून विविध ठिकाणच्या पालख्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जातात. त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली असते. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर व मनोभावे पूजाअर्चा होते.  अरणगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुरातन काळातील असून, धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. भाविकांचे हे श्रद्धास्थान असून, दर्शनासाठी लांबून भाविक येतात. आज या ठिकाणी विधिवत कार्यक्रम पार पडून मूर्तीचे पूजन करण्यात आले, असे ते म्हणाले.

Back to top button