नगरकरांना दिलासा ; करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात करोनाने थैमान घातले होते. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिसत आहे. आज जिल्ह्यात ८१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाला आहे. त्यामुळे नगरकरांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाने गेलेल्या नियमांचे पालन करणे हे तितकेच गरजेचे आहे.
आज नवे ४९९ करोनाबाधित रुग्ण आढलेले आहे. आजअखेर जिल्ह्यात २ लाख ६० हजार ९१० जणांनी करोनावर मात केली आहे. तर उपचार घेणाऱ्यांची संख्या ५ हजार ८१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७१ आणि अँटीजेन चाचणीत ३०९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये जामखेड ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०३, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०५, जामखेड ३४, कर्जत ०३, नगर ग्रा.०३, नेवासा २४, पारनेर ०६, पाथर्डी ११, राहाता १९, राहुरी ०४, संगमनेर १८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २० आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३०९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले ५१, जामखेड ११, कर्जत १२, कोपरगाव ११, नगर ग्रा. ०८, नेवासा १४, पारनेर ३४, पाथर्डी ४३, राहाता १५, राहुरी १०, संगमनेर ४१, शेवगाव १०, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट ०४ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४९, अकोले ३४, जामखेड २७, कर्जत ७८, कोपरगाव ३८, नगर ग्रामीण ५८, नेवासा ५६, पारनेर ४६, पाथर्डी १२५, राहाता २०, राहुरी ४९, संगमनेर ५९, शेवगाव ३२, श्रीगोंदा ५९, श्रीरामपूर ५६, कॅन्टोन्मेंट ०४, मिलिटरी हॉस्पिटल ०८ इतर जिल्हा २० अशा रुग्णांचा समावेश आहे. ————