अहमदनगरकृषी

नगरमध्ये कांदा कोसळला मात्र ‘या’ ठिकाणी वधारला!

अहमदनगर : येथील नेप्तीकृषी उत्पन्न बाजार समितीत काल ४५ हजार ३१९ कांदा गोण्यांची अवाक झाली होती. मात्र आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहेत. तर दुसरीकडे
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ हजार १९१ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात एक नंबर कांद्याला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर दोन नंबर कांद्यास १०५० ते १५५०, तीन नंबर कांद्यास ५०० ते १०००, गोल्टी कांद्यास १२०० ते १५००, जोड कांदा १०० ते ५०० असा भाव निघाला आहे, त्याचप्रमाणे येथे १४ हजार ६४२ क्रेट्स डाळिंबाची मोठी आवक झाली. त्यात एक नंबर डाळिंबाला ८६ ते ११० रुपये, दोन नंबर डाळिंबास ६१ ते ८५, तीन नंबर ३१ ते ६०, चार नंबर २.५० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव निघाला.

Back to top button