अहमदनगरमहाराष्ट्र

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नी तांडवात दहा जणांचा मृत्यू

अहमदनगर- नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत सुमारे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तर 15 ते 20 रुग्ण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

नगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने तसेच एमआयडीसी आणि लष्कराच्या दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. अत्यवस्थ रुग्णांना इतर कक्षात स्थलांतरित करण्यात आले.

जिल्हा सरकारी रुग्णालयातील 10 मृतांची नावे
रामकिसन विठ्ठल हरपुडे( वय ७०), सिताराम दगडू जाधव (८३), सत्यभामा शिवाजी घोडचौरे( ६५)य, कडूबाळ गंगाधर खाटीक (६५), शिवाजी सदाशिव पवार (८२) , दीपक विश्वनाथ जेडगुले (५७), कोंडाबाई मधुकर कदम (७०), आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५)
व एक अनोळखी चार महिला व सहा पुरुष अशा दहा जणांचा मृत्यू

Back to top button