नगर पाठोपाठ या ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर छापे

अहमदनगर: नगर पाठोपाठ राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परीसरात राहुरी पोलिसांनी दारू अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली असून यात सुमारे एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
म्हैसगाव परिसरामध्ये अवैध दारूसाठा असल्याची गुप्त माहिती दुधाळ यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यात देशी, विदेशी दारुसह बीअरच्या बाटल्या असा सुमारे एक लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दुधाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासुन अवैध दारू विक्रीविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यातच दिवसभरात ठिकठिकाणी दारू अड्ड्यांवर छापे मारले असून दीड लाखांच्या पुढे मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.