नयन तांदळेसह पाच जनावर मोक्का

अहमदनगर : सराईत गुन्हेगार नयन तांदळेसह पाच जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या टोळीविरोधात येथील मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.नयन राजेंद्र तांदळे (वय 25 रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (वय 27 रा. झापवाडी ता. नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय 23 रा. प्रेमदान, सावेडी), शाहुल अशोक पवार (वय 31), अमोल छगन पोटे (वय 28 दोघे रा. सुपा ता. पारनेर) असे मोक्का अंतर्गत दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपीविरोधात सुपा पोलीस ठाण्यासह नगर शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, लुटमार, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.