Travelअहमदनगर

नवीन डीपी रस्त्यावरील अतिक्रमने काढण्याचा मनपाचा प्रयत्न

अहमदनगर – तारकपूर रस्ता ते रामवाडी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता हा नवीन डीपी रस्ता म्हणून मनपाने घोषित केला आहे. या रस्त्याच्या कामाला आता गती देण्यात येत आहे. परंतु रस्त्याचे काम करत असताना रस्त्यावर रामवाडी येथील काहींनी अनाधिकृतपणे दुकाने थाटली आहे. ही अनाधिकृत दुकानाचे अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने गुरूवारी सकाळपासून मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये सुरुवात करण्यात आली होती.
परंतु सध्या करोनाचे सावट असल्यामुळे दुकानदारांची दुकाने बंद होती. दुकानातील सामान आतमध्ये पडून आहे. दुकानातील सामान काढण्यास आम्हाला मुभा द्यावी व त्यानंतर आपण आपली कारवाई करावी, अशी विनंती दुकानदारांनी केली व त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी एक दिवसांची मुदत दुकानदराना देण्यात आली असल्याचे सांगितले. जर एक दिवसाच्या आता दुकानदारांनी दुकाने खाली केली नाही, तर मनपा अतिक्रमण विभाग ही दुकाने जमीनदोस्त करणार असा इशाराही इथापे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button