अहमदनगरमहाराष्ट्र

नांगरणीवरून तरूणावर केले कोयत्याने वार!

अहमदनगर : शेतात नांगरणी करण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली आहे. याबाबत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  या मारहाणीत मुसा मेहबूब पठाण (वय ३६ वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे .
याबाबत सविस्तर असे की, ब्राम्हणी येथील राहणारा मुसा मेहबूब पठाण याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. २५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ब्राम्हणी येथील शेती गट नंबर ३८/१ येथे शेत नांगरणी करण्याच्या कारणावरून त्याच्यावर पाच जणांनी मिळून कोयत्याने वार केले. तसेच गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
पठाण याच्या या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी शब्बीर मिरसाहब शेख, नवाब मीरसाहब शेख, नसीर शेख, सद्दाम शब्बीर शेख, अल्ताफ नवाब शेख व सुन्ना अहमद शेख (सर्व रा.  ब्राह्मणी तालुका राहुरी) या सहा जणांवर जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार पारधी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button