Travelमहाराष्ट्र

नागठाणेत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

महासंदेश : नागठाणे (ता. सातारा) येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
मालन बबन गायकवाड (वय ५५, रा. नागठाणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.या महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या जनावरांच्या दवाखान्यालगत असणाऱ्या चाळीतील एका खोलीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञाना पाचारण केले आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृत महिलेचा मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. ऐन आषाढी एकादशी दिवशीच ही घटना उघडकीस आल्याने नागठाणे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button