अहमदनगर

निंबळक शाळेत विविध उपक्रमांनी शैक्षणिक वर्षाची सुरुवात

अहमदनगर : नगर तालुक्यातील  निंबळक जिल्हा परिषदेच्या शाळेत नवागतांचे स्वागत तसेच वृक्षारोपण आदी उपक्रमांनी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात वड, अशोक, शेवगा, कढीपत्ता लिंबू अशी विविध प्रकारची पन्नास झाडे लावण्यात आली.

 तसेच मार्च महिन्यापासूनच इयत्ता पहिलीतील दाखल पात्र मुलांचे प्रवेश सुरु केलेले होते. इयत्ता पहिलीच्या या प्रवेश उपक्रमास निंबळक येथील पालकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद असून आजपर्यंत ६५ मुले इयत्ता पहिली मध्ये दाखल झाली आहेत.  नवागत उपस्थित मुलांचे स्वागत व वृक्षारोपण जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना शाळेचे मुख्याध्यापक पोपट धामणे यांनी  तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार, निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव गायकवाड, उद्योजक अजय लामखडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कोतकर, 

दत्तूअण्णा कोतकर, ग्राम विकास अधिकारी अनिल भाकरे, बी. डी कोतकर, शालेय  व्यवस्थापन समिती अध्यक्ष साधना लामखडे, स्वाती लामखडे, रूपाली होळकर, समीर शेख, दत्तात्रय धावडे व शाळेतील शिक्षक दत्तात्रय कडूस, सुखदेव पालवे, प्रयागा मोहोळकर, कल्पना शिंदे, सुनिता रणदिवे, प्रज्ञा हापसे, अलका कांडेकर, सुजाता किंबहुने, अर्चना जाचक, भागचंद सातपुते, विशाल  कुलट उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय जाधव यांनी केले तर आभार राजेंद्र निमसे यांनी मानले.

Back to top button