निसर्गसंवर्धनाचे महत्व तरुण पिढीच्या मनावर रुजविणे आवश्यक : कर्नल जीवन झेंडे

महासंदेश : निसर्गाची होत असलेली अतोनात हानी लक्षात घेता भविष्यकाळातील येणाऱ्या पिढीसाठीनैसर्गिक साधनसंपत्ती जतन करून ठेवणे हे आजच्या पिढीसमोरील आव्हान बनले आहे. त्यामुळेनिसर्गसंवर्धनाचे महत्व तरुण पिढीच्या मनावर रुजविणे आवश्यक आहे, असे मत १७ महाराष्ट्र बटालियनचे सीईओ कर्नल जीवन झेंडे यांनी व्यक्त केले.
१७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. यांच्यातर्फे आयोजित एक पौधा एक संकल्प अभियानांतर्गत न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित वृक्षरोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या अभियानांतर्गत एकूण १ हजार ४०० रोपांचे रोपण केले जाणार असून, पैकी १५० रोप न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या आवारात लावण्यात आली.
मानव जीवनाच्या दृष्टिकोनातून वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षारोपण करून त्याचे पालकत्व स्विकारले पाहिजे तरच निसर्ग संवर्धन शक्य आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले.
या प्रसंगी एसएम. लोकेंदर सिंग, रेसिडेन्सिअल माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक दोडके सर, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. ए. के. पंदरकर, कला शाखा उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. एस. बी. कळमकर, अधीक्षक बी. के. साबळे, पर्यवेक्षक दारकुंडे, एन.सी.सी. प्रमूख कॅप्टन प्राजक्ता भंडारी, लेफ्टनंट भरत होळकर,गणेश भापकर, प्रा. गणेश निमसे, प्रा. धन्यकुमार हराळ व एन.सी.सी. चे कॅडेट्स उपस्थित होते.