Travelअहमदनगरमहाराष्ट्र

नोकरीचे आमिष दाखवून युवकाची ५ लाखांची फसवणूक

महासंदेश : सैन्य दलात नोकरी लावून देतो असे सांगत युवकाची ४ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नाशिक मध्ये उघडकीस आला आहे. याबाबत येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एक संशयित ताब्यात घेतला आहे.

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील रहिवासी विशाल खोकले (२७) हे नोकरी करतात. त्यांच्याशी संशयित सोमनाथ ढोले यांनी संपर्क साधला. ढोलेने विशाल यांना सैन्य दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. संशयित भरत कुमार, जोगींदर कुमार, उमेशकु मार, प्रमोदकु मार, विकास कुमार, अजयकु माल विशाल उर्फ सचिन चौधरी, पवनकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून ओळख करून दिली. संशयितांनी नोकरी लावून देतो, असे सांगत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या नावाने बनावट पत्र पाठवून विशाल यांचा विश्वास संपादन केला.  त्यांच्याकडून नोकरी लावण्यासाठी चार लाख, ९६ हजार २९० रुपये घेतले. परंतु, नोकरी न लागल्याने विशाल यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबधिता विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सोमनाथ ढोले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Back to top button