अहमदनगर

पाथर्डीत दोन गटात सशस्त्र दंगल!

 आठ मोटरसायकल फोडल्या :आठजण गंभीर जखमी 

अहमदनगर : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकजण त्यासोबत लढा देत आहे. तर दुसरीकडे काहीजण विनाकारण गोंधळ घालत आहेत. असाच प्रकार पाथर्डी शहरातील अजंठा चौकात घडला. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्याशिरसाठवाडी येथील युवक विरुद्ध भिकनवाडा येथील युवकांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.यावेळी तलवारी, लोखंडीराँड, चाकु,काठ्यांचा वापर केला. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या मारमारीत सात मोटारसायकल फोडल्या.यामुळे शहरात काही काळ दंगलसदृष्य परस्थीती निर्माण झाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत दंगल मिटवली. या प्रकरणी पाच जणांनाअटक केली असून येथीलवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती सरपाते यांनी त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान शहरात दंगलनियंत्रण विभागाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत आठ जण गंभीर जखमी झाले असून, दोन्ही गटांच्या पंचवीस व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत शिरसाठवाडी येथील गणेश बाळासाहेब शिरसाठ  यानेपोलिसात फिर्याद दिली आहे की, मी व इतर सहकारी हे अजंठा चौकात दुध विक्री करत होतो. यावेळी भिकनवाडा येथील मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्कालागला व दुध सांडले. त्याला आम्ही  दुध सांडल्याचा जाब विचारल्याचा राग आला. त्याने   १० ते १२ जणांना बोलावुन घेतले. या सर्वांनी  फिर्यादी व त्यांचे सहकाऱ्यांना तलवार, चाकू, लोखंडी गज, लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान केले.  दुसरी फिर्यादअमीर उर्फ मुन्ना निजाम शेख याने दिली आहे. मुन्नाच्या गाडीचा धक्कालागल्याने राग येऊन गणेशशिरसाठ यांच्यासह १० ते १२जणांनी मला व इतर सहकाऱ्यांना तलवार,लोखंडी गज, लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी फारूक रफिक शेख, जुबेर शफीक आतार, भैय्या शेख, कलंदर शेख, हमीद नजीर शेख या पाच जणांना  अटक केली आहे. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत सात ते आठ दुचाकीचे नुकसान झाले असून दगडफेकीमुळे रस्त्यावरदगडांचा खच पडला होता. अचानक झालेल्या धुमचक्रीने नागरिकांची पळपळ झाली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शनमुंडे यांनी मंगळवारी रात्री घटनास्थळाला भेटी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button