अहमदनगर

पिडीत युवतीची आत्महत्या

अहमदनगर : बोल्हेगाव परिसरातील एका युवतीने मानसिक त्रासातून स्वत:चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत युवतीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बोल्हेगाव परिसरात 17 वर्षीय युवती आपल्या आई- वडिलांसोबत राहत होती. या युवतीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. यामुळे सदर युवती गर्भवती राहिली. अत्याचार झालेल्या युवतीला आपण गर्भवती राहिल्याचा धक्का बसला. या मानसिक त्रासातून तीने 4 जून रोजी सायंकाळी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. युवतीने गळफास घेतल्याचा धक्का आई- वडिलांना बसला. सुरूवातीला तोफखाना पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मानसिक स्थिती ठिक झाल्यानंतर मयत युवतीच्या आईने काल तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक विकास देवरे, आर. एन. पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. युवतीवर अत्याचार करणार्‍या त्या इसमाचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

Back to top button