महाराष्ट्र

पिस्तुल बाळगणारा जेरबंद

महासंदेश : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणारा गुंड पोलिसांनी सोमवार पेठ भागात पकडला. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
नावेद शेख (वय-२०, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोमवार पेठेतील ससून कर्मचारी वसाहत परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, शाम सूर्यवंशी, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुमीत खुट्टे, विठ्ठल चोरमले यांनी ही कारवाई केली.

Back to top button