पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता !

महासंदेश : सध्या कोरोना व बुरशीजन्य आजारामुळे नागरिक पुरते वैतागले असतानाच परत एका नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यास चक्रीवादळाचा आता पर्यंत सर्वात जास्त तडाखा पश्चिम बंगाल व ओडिशाला बसला आहे. या दोन्ही राज्यातमध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला आहे .
या चक्रीवादळामुळे असंख्य झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले असून हजारो गावातील वीज गेली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याचा फटका कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर जाणवणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी सहा विमाने रद्द करण्यात आली आहेत.