महाराष्ट्र

पुणे येथे १९ जूनला डाक अदालतीचे आयोजन

अहमदनगर :  पोस्टमास्तर जनरल, पुणे रीजन पुणेव्दारा 19 जून रोजी पोस्टमास्तर जनरल, पुणे यांच्या कार्यालयामध्ये 60 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्यपध्दती विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.

 विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिका-यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार  एन. व्ही. केंजळे, मॅनेजर, बी. डी. जी. पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, पुणे क्षेत्र, पुणे यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 17 जून 2021 पर्यंत अथवा तत्पुर्वी  पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतील जाणार नाही. असे पोस्टमास्तर जनरल, पुणे रीजन पुणे यांनी कळविले आहे. 

Back to top button