पुरंदरच्या पश्चिम खोऱ्यात पावसाची जोरदार हजेरी

महासंदेश : पुरंदर तालुक्याच्या पश्चिम खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागातील पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आता जमिनीची मशागतिला सुरुवात होणार असल्याने शेतकरी राजा सुखावला असल्याचे पाहावयास मिळते आहे. तर सासवड शहरांमध्ये मान्सून दाखल होण्या आधिच मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचले होते.
या पावसाने दिवे घाटातील धबधबे सुरु झाल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाली. तर काही प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
भिवरी येथे अडीच ते चार पर्यंत आस्करवाडी च्या बाजूने मोठा पाऊस झाल्याने शेतीच्या मशागतीची कामे सुरू होतील अंदाजे दीड ते दोन तास चाललेल्या पावसात संपूर्ण भात कचरे व ओढे नाले दुथडी भरून वाहत होते. शेतीसाठी हा पूरक पाऊस असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे शेतकर्यामधून बोलले जाता आहे.