अर्थविश्वदेश-विदेशमहाराष्ट्र

पेट्रोल, डीझेल दरवाढीवर एकच पर्याय “इथेनॉल” : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महासंदेश : करोनाच्या काळात पेट्रोल व डीझेल च्या भाव गगनाला भिडले आहेत. देशातील सात हून अधिक राज्यांमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे सलगच्या दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यावर, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एक उपाय सूचवला असून, पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईला इथेनॉल हाच एक पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत गडकरी म्हणाले, भारतात देखील इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे स्वस्त इंधन पर्याय बाजारात आवश्यक आहे. अमेरिका, कॅनडा तसेच ब्राझील अशा देशांमध्ये वाहन उत्पादकांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरु केली आहे. त्यामुळे वाहनांमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय आहे, असे गडकरी यांनी सांगितले. २०२५ पर्यंत देशात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. इथेनॉलचा दर प्रती लीटर ६० ते ६२ रुपये असेल. त्यातुलनेत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. इथेनॉल आणि पेट्रोलच्या तुलना केल्यास एक लीटर इथेनॉल हे ७५० ते ८०० मिली पेट्रोल इतके असेल. यातही ग्राहकाची २० रुपयाची बचत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Back to top button