अहमदनगरमहाराष्ट्र

पॉलिटेक्‍निक प्रवेशासाठी मुदतवाढ

महासंदेश : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आता विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर छाननी करून अंतिम गुणवत्ता यादी 14 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. पॉलिटेक्‍निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालाअगोदरच सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 30 जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यांनतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्‍यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी 9 ऑगस्टला जाहीर होणार आहे. 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान यावर आक्षेप स्वीकारले जाणार असून, 14 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.

हेल्पलाइन
पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून 8698742360 आणि 8698781669 या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे. सविस्तर माहिती http://poly21.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Back to top button