अहमदनगर

पोलिसांचे खोटे ओळखपत्र तयार करून पोलीस दलाची फसवणूक

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी ही बाब आणली निदर्शनास

अहमदनगर : सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी नयन तांदळेसह त्याच्या साथीदारांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न होत आहे. या टोळीने एका व्यक्तीचे पाकीट चोरून त्यातील फोटाचा गैरवापर करत पोलिसांचे खोटे ओळखपत्र तयार करून पोलीस दलाची फसवणूक केली आहे. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या ही बाब निदर्शनास आली.

या प्रकरणी तांदळेसह टोळीविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश साहेबराव ससे (वय-29 रा. झोपटी कॅन्टींग, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नगर-मनमाड रत्यावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा घेत असताना नयन तांदळे व टोळीने त्यांचे पाकीट चोरले होते. त्यातील फोटोचा गैरवापर करून पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button