महाराष्ट्र

पोलिसांना ‘धक्काबुकी’

दोघांवर गुन्हा दाखल; आरोपी अटकेत

महासंदेश : भुकूम (ता.मुळशी ) येथील टि टु पेट्रोल पंपासमोर पोलीस तपासणी करत असतांना पौड पोलिसाला धक्काबुक्की करत खाली पाडून हाताने मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार दि.१९ सोमवारी दुपारी घडला.

यामध्ये पोलीस हवालदार सुनिल मगर व सहाय्यक फौजदार एस.पी.कुंभार जखमी झाले आहेत.
पोलीस हवालदार सुनिल तुळशीदास मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कमलेष दत्ताञय
वाळुंज, (रा. इंदायणीनगर भोसरी), चैतन्य संजय आव्हाड (रा.जवळकरनगर सृष्टी चौक ,पिंपळेगुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार मगर यांनी आरोपी यांना तुम्ही तुमची गाडी रोडवर थांबण्याचे कारण विचारले असताना व त्यांना मास्क लावण्यास सांगितले असता त्यांनी रागाने कुंभार यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. गुडघ्याला मार लागला व दमदाटी करुन मगर यांचा अंगावरील सरकारी वर्दी ओडून, खाली पाडून हाताने मारहाण करुन उजव्या हातास दुखापत केली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.

Back to top button