अहमदनगरमहाराष्ट्र

पोलिसांवर दगडफेक

महासंदेश : कराड येथील बुधवार पेठेत रात्रीच्या वेळी डीजे सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत डीजे बंद करण्यास सांगितल्यानंतर पोलिसांवरच दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. अंधाराचा फायदा घेत जमावाकडून हे कृत्य करण्यात आल्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील बुधवार पेठ परिसरात रात्रीच्या वेळी डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डीजे संबंधितांना बंद करण्यास सांगितले. मात्र, तेथील युवकांनी अचानकपणे लाईट घालवत अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर दगडफेक केली. सुदैवाने या घटनेत एकही पोलिस कर्मचारी जखमी झालेला नाही. मात्र, या घटनेने कराड शहर परिसरात खळबळ उडाली असून एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Back to top button