Travelअहमदनगरमहाराष्ट्र

पोलिसाने डॉक्टरसह कर्मचाऱ्यास बदडले !

महासंदेश : तुम्ही आमचे फोन का उचलत नाही? असे म्हणत डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्याला एका पोलीस नाईकासह त्याच्या भावाने शिवीगाळ केली.तसेच मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात सुरक्षा अधिकाऱ्यालाही मारहाण केली. ही घटना पुण्यातील बाणेर येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये घडली.
याप्रकरणी पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड आणि त्याचा भाऊ सागर सिद्धेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अजयश्री अधिकराव मस्कर यांनी फिर्याद दिली आहे.

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास डॉ.अजयश्री बाणेर येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी सागर गायकवाड त्यांच्या कार्यालयात आला. त्याने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेला रुग्ण प्रवीण जाधव याचा भाचा असल्याचे सांगितले. त्याने तुम्ही आमचे फोन का उचलत नाही? असे म्हणत डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात सुरक्षा अधिकाऱ्यालाही मारहाण केली. प्रकरणानंतर डॉ. अजयश्री हे इतर स्टाफ आणि महापालिकेच्या सिक्युरिटी गार्डसोबत बाणेर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. झालेल्या प्रकाराची पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देत असताना आरोपी सागर गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनी आत प्रवेश करून पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा अधिकारी अजित गजमल यांनादेखील दोन्ही आरोपींनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button