अहमदनगर

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली
जेऊर येथील महिलेची फसवणूक; कोतवालीकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
नगर, दि.28 (प्रतिनिधी) – सामान्यांना न्याय देण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना जेऊर येथील एका महिलाचे जमीन विक्रीमध्ये फसवणूक झाली. तीन महिन्यांपासून कोतवाली पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वत्सलाबाई गोरक्षनाथ तोडमल (रा. जेऊर) पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वत्सलाबाई तोडलम (वय-75) यांना तुझे आधार कार्ड वरील गोरख व गोरक्ष या नावाची झालेली चूक दुरुस्त करू, असे म्हणून माझ्या मालकीची जेऊर येथील शेत जमीन गट नंबर 1510 मधील 92 आर क्षेत्राची खरेदी खत करून घेतली. माझी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर 2020 रोजी तक्रार अर्ज दिला. याबबत चौकशी कामी संबंधित पोलीस अधिकारी यांनी बोलवून आमचे जबाब नोंदविले. तसेच बँक डिटेल घेऊन कोतवाली पोलिसांनी वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक फिर्याद न घेता संशयित आरोपींचा फायदा व्हावा, या उद्देशाने फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली आहे, असे तोडमल यांनी निवेदनात म्हटले आहे.

चौकट…
पोलीस अधीक्षक कारवाई करणार का?
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये सर्वसान्य नागरिकांचे गुन्हे दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जाते. याप्रकरणी पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले असता गुन्हा दाखल न करणार्‍या अधिकार्‍यांवर थेट कारवाई करू असे आश्‍वासित केले होते. आता या फसवणूक प्रकरणात पोलीस अधीक्षक लक्ष घालणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

क्वोट
कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या अर्जाची निर्गती करून तसा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला आहे.
विशाल ढुमे
पोलीस उपाधीक्षक (शहर)

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button