अहमदनगर

पोलीस असल्याचे सांगत एकास लुटले !

अहमदनगर : आपण पोलीस असल्याचे सांगत एका भामट्याने ज्येष्ठ व्यक्तीला ७ हजार रुपयांना लुटले आहे. हि घटना  संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारात घडली आहे. लक्ष्मण कृष्णाजी खेमनर (रा.चणेगाव, ता. संगमनेर)  असे त्या ज्येष्ठ व्यक्तीचे  नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल सकाळी १० वाजेच्या सुमारास लक्ष्मण कृष्णाजी खेमनर हे दाढ खुर्द येथील स्मशान भूमीशेजारून चालले होते. यावेळी त्यांना अडवून एका अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करत तपासणी करण्यासाठी त्यांना खिशातील सर्व सामान बाहेर काढण्यास सांगितले. याप्रसंगी मोठ्या चलाखीने त्याने पाकिटातील ७ हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली व खिशातील बाकी वस्तू रुमालात बांधून पिशवीत टाकल्या व तेथून निघून गेला. यानतंर खेमनर यांनी आपल्या सामानाची पाहणी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी आश्वी पोलीस ठाणे गाठले. येथे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.

Back to top button