अहमदनगरमहाराष्ट्र

पोलीस चेकपोस्टच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा बसेल : आमदार रोहित पवार

महासंदेश : कर्जत- जामखेड मतदारसंघातील सर्व पोलीस ठाणे अद्यावत करायचे असून, ते सर्वसामान्य जनतेसाठी कार्यपुरक ठरली जातील. अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्याचे काम जनतेच्या हितावहच असायला हवे असे, प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस चौकी लोकार्पण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माने, अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार पवार म्हणाले, मतदारसंघात असलेल्या सर्वसामान्य जनतेची चांगली सेवा व्हावी यासाठी ही मदत आहे. न्याय देताना राजकारण न आणता पोलिसांनी सर्वसामान्यांची काळजी घ्यावी. पोलिसांनी सुरू केलेल्या अनेक यंत्रणा लोकांना न्याय मिळवून देत आहेत. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. यापुढेही अशी कोणतीही प्रभावी यंत्रणा राबवायची असेल तर त्यासाठी आमचा कर्जत जामखेड मतदारसंघ सर्वात पुढे असेल अशी ग्वाही आ पवार यांनी दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, आ. रोहित पवारांनी उपलब्ध करून दिलेल्या चेक पोस्टमुळे पोलिसांना ऊन, वारा, पावसात काम करणे यामुळे सोयीचे होणार आहे. पोलिसांची काळजी घेतली तर पोलिसांच्या मनात देखील समाजाप्रती काळजी घेण्याची इच्छा निर्माण होईल. कुणावर कुठे अन्याय झाला, अत्याचार झाला तर केवळ फिर्याद द्यावी पुढची सर्व जबाबदारी पोलीस प्रामाणिकपणे पार पाडतील. पोलिसांचे मनोधेर्य वाढवण्याचे काम आ. पवार यांनी केले आहे. जिल्ह्याचा पोलिस खात्याचा प्रमुख म्हणुन मी त्यांचे आभार व अभिनंदन व्यक्त करतो.
पोलिसांची जेवढी काळजी घेतली आहे तेवढी जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्य जनतेची उत्कृष्ट सेवा करण्याची हमी प्रमुख म्हणून आपण याप्रसंगी देत आहोत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
यावेळी कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेलार, प्रा विशाल मेहेत्रे, युवकचे नितीन धांडे, भास्कर भैलुमे, महिला आघाडीच्या मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, सोशल मीडियाचे दीपक यादव, सतीश पाटील, रज्जाक झारेकरी, बाबा भिसे, काका चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button