अहमदनगर

प्रभागनिहाय लसीकरणाच्या राजगुरूंच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

नगर, दि.२२ (प्रतिनिधी) – पाथर्डी शहरातील एकमेव लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रभाग निहाय लसीकरण केंद्र सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी केली होती. यावर तहसील कार्यालयात बैठक होऊन मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर तातडीने मागणीची अंमलबजावणी करु, असे आश्वासन तहसीलदार श्याम वारकड यांनी दिले.

     मागील पंधरा दिवसापूर्वी नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी पत्राद्वारे वाढीव लसीकरण केंद्रा संदर्भात मागणी केली होती. या संदर्भात तहसीलदार वारकड यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.

 यावेळी राजगुरू म्हणाले, शहरातील जिल्हा परिषदेच्या तालुका केंद्र शाळेमध्ये एकमेव लसीकरण केंद्र सुरू असल्याने शेकडो नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करत आहेत. यामुळे करोनाचा संसर्ग अनाहूतपणे वाढण्यास मदत होत आहे. प्रभाग निहाय व नगरपरिषदेच्या मतदार यादी नुसार लसीकरण मोहीम राबविल्यास गर्दी कमी होऊन सर्वांना लस मिळण्यास मदत होईल. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभेल. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वय साधून लसीकरण मोहीमेसह करोना टेस्ट चा उपक्रम एकत्रितपणे राबविल्यास करोनाची साखळी निश्चितच तोडण्यास तोडण्यास मदत होईल असे, ते म्हणाले.

 तर यावेळी आगामी मी पंधरा ते वीस दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आपण प्रभाग निहाय नियोजन करून लसीकरण केंद्र सुरू करू, असे तहसीलदार वारकड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button