अर्थविश्वदेश-विदेशमहाराष्ट्र

बँकांची आर्थिक फसवणूक प्रकरणी ; विजय मल्ल्या ला दणका

६ हजार २०० कोटीपेक्षा अधिका कर्जाची वसुली होणार   

महासंदेश : देशातील बँकाची आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय मल्ल्या याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६ हजार २०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील विजय मल्ल्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील.

 विजय मल्ल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय मल्ल्याविरोधातील पहिली मोठी वसुली ठरणार आहे. किंगफिशरला देण्यात आलेले कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आले होते. विजय मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पळ काढला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शेअर्सची विक्री डेट रिकव्हरी ट्रायब्यूनलच्या देखरेखीखाली होणारमनी कंट्रोलने काही कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, या शेअर्सची विक्री बंगळुरुमधील डेट रिकव्हरी ट्रायब्यूनलच्या (DRT)देखरेखीखाली होईल.

विजय मल्ल्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे. दरम्यान, विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Back to top button