अहमदनगर

‘बाजार समितीच्या आधी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका घ्या’

अहमदनगर :  नगर तालुक्यातील मुदत संपलेल्या सेवा सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

    नगर तालुक्यातील अनेक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या मुदत संपून अनेक महिने झाले आहेत. सोसायटीचे संचालक हे तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार असतात. त्यामुळे सदर सोसायटी यांची निवडणूक होणे गरजेचे आहे. मुदत संपलेली असताना सोसायटीचे संचालक हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार म्हणून अपात्र ठरू शकतात.

      कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीपूर्वी मुदत संपलेल्या सोसायट्यांची निवडणूक घेणे कायदेशीरदृष्ट्या योग्य राहील. तसेच नवीन संचालकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील सर्व मुदत संपलेल्या सेवा सहकारी सोसायटी यांच्या निवडणुका घेण्याची मागणी गोविंद मोकाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Back to top button