महाराष्ट्र

बापरे ! चोरांनी चक्क एटीम मशीनच कापून नेले…

महासंदेश : चोरटे कोणत्या वस्तूची चोरी करतील याचा काहीच अंदाज लावता येत नाही. नुकतीच लाखो रुपयांच्या रक्कमेसह स्टेट बँकेचे अख्ख एटीएम मशीनच चोरट्यांनी कापून नेले आहे. ही घटना चाळीसगाव शहरात घडली आहे. या घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली आहे. या एटीएम मशीनमध्ये जवळपास १७ लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील खरजई नाक्याजवळील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे एटीएम मशीनच काल रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. या मशीनमध्ये तब्बल १७ लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी अख्ख एटीएम मशीनच कापून नेले आहे . विशेष म्हणजे, ज्या भागात हे एटीएम मशीन आहे तो पूर्णपणे रहिवासी भाग आहे. या एटीएम सेंटरला लागूनच अनेक दुकाने आणि घरे आहेत. रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरांनी एटीम मशीन कापले आणि वाहनातून पोबारा झाले. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या हि बाब लक्षात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले व पंचनामा केला. दरम्यान, चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेल्याने पोलीस चारचाकी वाहनाबाबत काही सुगावा लागतो का, यादृष्टीने तपास करीत आहेत.

Back to top button