Travelदेश-विदेशमहाराष्ट्र

बेजबाबदारपणा सोडा अन्यथा … लशीचाही उपयोग होणार नाही ?

महासंदेश : आपल्या बेजबाबादपणामुळे मानवी शरीरात विषाणूची संख्या वाढण्यासाठी, तसेच स्वतःत बदल करण्यासाठी कोरोनाला अनुकूल वातावरण  मिळते. त्यामुळे आपण कोरोनाच्या ताब्यात शरीर द्यायचे की नाही, हे आपणच ठरवायचे आहे. आरोग्यविषयक सुविधा चौपट वाढवल्या, तरी कोविड अनुरूप वर्तन ठेवले  तरच संसर्गापासून बचाव होऊ शकतो. काही लोकांमध्ये जागरूकता झाली आहे; मात्र कोरोना रुग्णसंख्या घटताच लगेच बेपर्वाई वाढते. मास्क वापरणे , सॅनिटायझरचा वापर करणे वगैरे गोष्टी न विसरता आपण ज्याप्रमाणे कोरोनाला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, त्याप्रमाणे कोरोनाही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतो आहे. लस आणि कोरोना अनुरूप वर्तन ठेवणे यापेक्षा अन्य कोणत्याही उपायाने कोरोनावर मात करता येणार नाही. मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण झाले आणि त्या लोकसंख्येने कोरोनायोग्य वर्तन केले  तरच कोरोचा संसर्ग होण्यापासून आपण बचाव करू शकू तसेच त्याचे अस्तितत्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू शकू; मात्र तसं झालं नाही तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नसल्याचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर ऑफ सोशल मेडिसीन अँड कम्युनिटी हेल्थ विभागाचे अध्यक्ष डॉ. राजीवदास गुप्त यांनी म्हटले आहे .

गेल्या दीड वर्षापासून देश कोरोनाविरोधात लढाई लढत आहोत . पहिल्या लाटेतून बाहेर आलो म्हणेपर्यंत दुसऱ्या लाटेने कंबरडं मोडलं. आता आपल्या हाती लशीचं शस्त्र आहे. तसेच आयुष विभागाच्या दोन औषधांद्वारेही कोरोनावर मात करने  शक्य झाले आहे. तरीही अद्याप कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात ठोस यश मिळालेले नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण अधिक चांगल्या तऱ्हेने सज्ज होऊन उभे आहोत. तरीही माणसाच्या थोड्याशा बेफिकिरीचाही कोरोनाकडून फायदा घेतला जातो आणि संसर्गात वाढ होते. त्यामुळे सामूहिक पातळीवर कोरोना संसर्गाची साखळी  तोडता आलेली नाही.
 कोविड अनुरूप वर्तन लोकांना कोविडपासून वाचवू शकेल. कारण आपल्या एका बेसावध क्षणाची कोरोना वाट पाहत असतो. म्हणूनच योग्य वर्तनातून लोक स्वतःचा तर बचाव करू शकतीलच, पण त्याचा प्रसार होण्यालाही प्रतिबंध करू शकतील. त्यामुळे सतत मास्क, सॅनिटायझरचा वापर  व कोविड अनुरूप वर्तन आपल्याला कोरोनापासून वाचवू  शकतो असे ते म्हणाले आहेत. 

Back to top button