अहमदनगर

बोल्हेगावात ६३ हजारांचा सुगंधी तंबाखूचा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


अहमदनगर : बोल्हेगाव परिसरातील रेणुकानगर येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ६२ हजारांच्या किमतीची विक्रीला बंदी असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अमोल नानासाहेब काळे (रा.रेणुकानगर, बोल्हेगाव, नगर) असे आरोपीचे नाव असून, आरोपी पसार झाला आहे. बोल्हेगाव परिसरात रेणुकानगर येथे एका घरात विक्रीला बंदी असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाल्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी कमलेश पाथरुड यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पसार झाला आहे.

Back to top button