अहमदनगरमहाराष्ट्र

‘भाषणे ठोकण्यापेक्षा विकास कामांवर आपला भर’

‘त्या’ आमदाराचा विरोधकांना ‘टोला’
 ‌‌  अहमदनगर : जिल्हा परिषद किंवा १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन तीन लाख रुपयांची कामे मंजूर करून आणायची. लाख रुपयांच्या विकासकामाच्या नावाखाली हातभर भाषणे‌ ठोकायची काम सध्या विरोधक करत आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्यांची संख्या तालुक्यात वाढली आहे. मात्र आपलाभाषणे ठोकण्यापेक्षा तालुक्यातील विकासकामांवर भर असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली.  आमदार निलेश लंके यांच्या हस्ते जवळपास १ कोटी १० लाख रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की, शहरासह ग्रामीण भागातील अनेक प्रश्न प्रलंबित असून, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, पाणी यांच्यासह मूलभूत सोयीसुविधा सोडवण्यासाठी भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून पारनेर तालुक्यामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाली असल्याची ग्वाही आ. लंके यांनी ग्रामस्थांना दिली आहे. कोरोना काळात निधीची टंचाई असतानाही पारनेर तालुक्याला जास्तीत जास्त झुकते माप देण्याचे आपण प्रयत्न केला आहे. त्यामुळे विकास कामाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील छोटी-मोठी गावे व वाड्या वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. तर दुसरीकडे कोण काय करतं यापेक्षा आपल्याला किती काम करता येईल विकासकामांसाठी किती निधी आणता येईल यावर आपला भर असून, जनतेचा सेवक म्हणून आपण काम करत असल्याचे ते म्हणाले.

Back to top button