मंत्री गडाख यांच्या विरोधात आंदोलन करणार्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांंविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा

अहमदनगर – शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरोधात आंदोलन करणार्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांंविरोधात येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक बाबासाहेब गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान (रा. नेवासा) प्रतिक अरविंद बारसे (रा. केडगाव), आकाश मनोहर जाधव, योगेश साठे, जीवन पारधे, विशाल लोळगे, संतोष जठार, अजय पाखरे (रा. नागरदेवळे ता. नगर), संजय जगताप, अमर निरभवणे अशी गुन्हा दाखल झालेल्या वंचित बहुजनच्या पदाधिकार्यांची नावे आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक चौकात सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी व इतर लोकांनी घोषणाबाजी करत डीएसपी चौकात रस्ता रोको आंदोलन करून येणार्या-जाणार्या वाहनांना अडथळा निर्माण केला. जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.