देश-विदेशमहाराष्ट्र

मध्यरात्री तो शेजारच्या घरात घुसला अन् …!

महासंदेश : रात्री एक वाजेच्या सुमारास एका महिलेने शेजारच्या युवकावर चाकूहल्ला केला. यामुळे जखमी झालेला युवक आरडाओरड करत गच्चीवर पोहोचला. त्याच्या आवाजाने आजूबाजचे जमा झाले व त्यांनी या महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने तिची रवानगी तुरूंगात केली आहे. तर जखमी युवकास उपचारासाठी दाखल केले. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली आहे.
दरम्यान त्या महिलेने या शेजारच्या युवकाने बलात्काराच्या इराद्याने घरात प्रवेश केल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही ही महिला व या युवकात चांगले संबंध होते. काही बाबतीत दोघांमध्ये वाद झाला. आरोपी महिलेचा पती बाहेरगावी राहतो. यामुळे ती घरी एकटी राहते. त्या दिवशी एक वाजेच्या सुमारास शेजारचा तरूण गच्चीवरून घरात घुसल्याच्या आवाजाने ती महिला जागी झाली आणि चाकूने वार केले. 

Back to top button