मराठा आरक्षणासाठी दिल्ली काबीज करावी लागणार

महासंदेश : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण एकप्रकारे ढवळून निघाले आहे. मराठयांच्या आरक्षणासाठी स्वाभिमानाची धडक दिल्लीला द्यावी लागणार आहे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे ही आरक्षणासाठी आग्रही असून त्यांनी तीव्र आंदोलन सुरु केले आहे.
राज्याच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. मात्र, आज हा स्वाभिमानी, कष्ट करणारा समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. म्हणूनच या समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षणासाठी पुढची लढाई दिल्लीतच लढावी लागेल. यासाठी मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका राज्य सरकारने घ्यावी, असे संभाजीराजे छत्रपती सांगतात.
आरक्षणाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकतर त्यांनी ६ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच खासदारकीचा राजीनामा देऊ, बहुजन समाजाची इच्छा असेल तर स्वतंत्र पक्षही काढू असे सूतोवाचही केले आहेत.