अहमदनगरमहाराष्ट्र

मराठा आरक्षण प्रसंगी शासनाने आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या : तोरडमल

अहमदनगर : कर्जत येथील मराठासेवक नितीन तोरडमल या युवकाने मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनामध्ये अनेक युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय या क्रांतीदिनापासून घेतला आहे.


महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने मागील चार-पाच वर्षात झाली आहेत. या आंदोलनामधील मराठा समाजाच्या अनेक शाळकरी मुले, युवक आणि कार्यकर्त्यावर सरकारने मोठया प्रमाणात गुन्हे दाखल केलेले आहेत. ते सर्व गुन्हे आज न्यायप्रविष्ट असून अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांना शिक्षण, नोकरी व व्यवसाय यामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासह वरील कारणामुळे त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.

सरकारने अनेकवेळा मराठा अंदोकांनावरील गुन्हे मागे घेण्यासाठी खूप वेळा घोषणा करुन आश्वासने दिली आहेत. परंतु त्यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुन्हे तसेच प्रलंबित आहेत. पाठपुरावा करून देखील त्यावर काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक अंदोलनामध्ये सर्वांबरोबर सक्रीय सहभाग असणारे बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील मराठासेवक नितीन तोरडमल या युवकाने ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून सरकार न्यायालयातील सर्व गुन्हे प्रत्यक्षपणे मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मराठा समन्वयक अँड. धनराज राणे यांनी प्रसिद्ध पत्रक काढत माहिती दिली आहे.

Back to top button