अहमदनगरमहाराष्ट्र

मराठा आरक्षण: स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ‘हे’केंद्राला दोष देत आहेत !

अहमदनगर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र या महाआघाडीच्या सरकारला ते न्यायालयात टिकवता आले नाही. केंद्र १७०२ वी घटना दुरुस्ती केली आहे. राज्यसरकारने फेर याचीका दाखल करायला हवी होती, ती केली नाही. आंदोलनाची दिशा ठरवुन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंतच्या लढ्यात भाजप मराठा समाजासोबत राहणार आहे. असे मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

पाथर्डी येथे मराठा आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना विखे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण  टिकवता आले नाही. परंतु महाआघाडी सरकार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारला दोष देवुन जनतेची दिशआभुल

करत आहे. छत्रपती संभाजी राजेंनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारण्याची घोषणा

केली आहे. ज्या संघटना आरक्षणासाठी लढत आहेत.त्या सर्व संघटनांसोबत भारतीय जनता पक्ष  राहणार आहे. 

यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासाठी ज्यांचे बळी गेले त्यांच्या वारसांना नोकरीत समावुन घ्या. मराठा मोर्चेक-या विरुद्धचे गुन्हे मागे घ्या. मराठा समाज शेतीवर अवलंबुन असल्याने त्यांची अवस्था खुप नाजुक झाली आहे. आरक्षण देवुन समाजाला उन्नत अवस्थेत आणावे लागेल. आरक्षणाच्या लढ्यात आम्ही जनेतसोबत होतो आणि आताही आहोत. महाआघाडी सरकारचे अपय़श झाकण्यासाठी ते दुस-याला दोष देत आहेत. आम्ही

महायुतीच्या काळात आरक्षण दिले होते ते टिकवता आले नाही. आता आरक्षण मिळालेच पाहीजे त्यासाठी लढा उभारण्यासाठी एकत्रीत या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.

Back to top button