अहमदनगर

मला तर मारहाण झालीच नाही…!

‘त्या’ आरोग्य कर्मचाऱ्याचा खुलासा

अहमदनगर : पारनेर ग्रामीण रुग्णालयात आमदार  निलेश लंके यांनी  आपणाला मारहाण  करण्याची सोशल मीडियात माहिती मिळाली. मात्र मला असली कुठलेही मारहाण झाली नसून, आमदार निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन कोव्हीड लशीकरणात टोकण वाटपात गोंधळ उडत असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा उंद्रे यांना गोंधळ उडणार नाही अशी समज  देऊन  निघून गेले. त्यांनी मला कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे आरोग्य कर्मचारी पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे.
 
आमदार निलेश लंके यांनी लसीकरणाचे काम करणाऱ्या पारनेर रुग्णालयातील शासकीय लिपिकाला मारहाण करीत महिला वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली होती. सदर घटना दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री पारनेर पंच्यात समितीचे  गटविकास अधिकारी माने  व पोलिस निरीक्षक  घनशाम बळप  व पोलीस कर्मचारी यांच्या समोर घडली असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची व योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे.  दरम्यान असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा  खुलासा संबंधित कर्मचारी पाटील याने रात्री केला आहे . 

Back to top button