महत्वाची बातमी : सोन्याच्या किमती 60 हजारांच्या पलीकडेही जाणार ? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात …

महासंदेश : सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सतत चढउतार होत आहेत. गेल्या एका आठवड्याविषयी बोलायचे झाले तर सोन्याच्या किंमतीत सुमारे 410 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या भावातही 123 रुपयांची वाढ दिसून आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मागील व्यापार सत्रात 9 जुलै रोजी सोन्याचे दर 10 ग्रॅम 47863 रुपयांवर बंद झाले होते, तर 16 जुलै रोजी सोन्याची किंमत 48,273 रुपये होती.
बाजार तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
सराफा बाजाराशी संबंधित तज्ञांच्या मते, सन 2021 अखेर सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जर गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांच्या कालावधीत आणि स्टॉपलॉससह खरेदी केली तर मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकेल. गतवर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करायची असल्यास सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाऊ शकते.
सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता तपासून पहा
जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल तर सोन्याची खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या. केंद्र सरकारने सोन्याचे शुद्धता तपासण्यासाठी अॅपही जारी केले आहे. ‘BIS Care app’ सह, ग्राहक सोन्याचे शुद्धता तपासू शकतात. अॅपद्वारे आपण केवळ सोन्याचे शुद्धता तपासू शकता तसेच त्यासंदर्भात तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचे लाइसेंस, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार दाखल करू शकतो.