अहमदनगरमहाराष्ट्र

महागाई विरोधात बहुजनचे ‘दे धक्का’ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्याचा नोंदविला निषेध

अहमदनगर : पेट्रोल, डिझेल व  घरगुती एलपीजी गॅसचे वाढवलेले दर तसेच खाद्यतेलाच्या दरवाढीचा निषेध बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलकांनी चक्क दुचाकींना धक्का देत केंद्र व राज्याचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे, मनोहर वाघ, गणेश चव्हाण, राधेलाल नकवाल, किरण सोनवणे, सुधीर खरात, घुगे महाराज, अजय साळवे, प्रताप सौदे, जहीर सय्यद, सागर ठाणगे, यश साळवे, कन्हैय्या गट्टम, बी.आर.गोहेर, दादाभाऊ पटेकर, हनिफ शेख, कानिफ आंबेडकर आदी सहभागी झाले होते.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन दुचाकी व रिक्षांना धक्का देत शहरातून मोर्चा काढला. माळीवाडा येथे महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आला. वाहनांना धक्का देत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले.

Back to top button