महाराष्ट्र

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीला आयएसओ मानांकन

महासंदेश : राज्यातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था म्हणून काम करणाऱ्या  महाराष्ट्र गुप्तावार्ता प्रबोधिनीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. प्रशिक्षण दर्जा आणि कार्यालयीन गुणवत्ता प्रणालीमध्ये केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मानांकन देण्यात आले आहे. राज्य गुप्तावार्ता आयुक्त आशुतोष डुंबरे, संचालक महादेव तांबडे, अश्विनी राख, विजयकुमार पळसुले यांनी मानांकन मिळविण्यासाठी काम केले.

 राज्य गुप्तवार्ता विभागासाठी थेट निवड होणाऱ्या सहायक गुप्तवार्ता अधिकारी आणि वरिष्ठ गुप्तावार्ता  अधिकाऱ्याना प्रबोधिनीच्यावतीने मुलभूत प्रशिक्षण देण्यात येते. पोलीस दलाच्या अधिकाऱ्यासह अमंलदार यांच्यासाठी सुरक्षा, गुप्तवार्ता, घातपात विरोधी तपासणी यासंदर्भात विविध विषयांची प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये उर्दू, बंगाली, तेलगू, माडिया गोंडी, गुरूमुखी, काश्मिरी भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत ७३७ प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली आहेत. त्यामध्ये एकुण ५ हजार ५२८ अधिकारी आणि १५ हजार ५१९ अमंलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. केद्रीय गृह मंत्रालयाकडून २०१९-२० कालावधीत सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षण संस्था म्हणून गौरविण्यात आले होते. 

Back to top button