अहमदनगर

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या खजिनदारपदी रवींद्र कदम

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी ढाकणे, उपाध्यक्ष कोकणे, सचिवपदी भोपे,
नगर, दि. 5 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची, उपाध्यक्षपदी सागर कोरणे, सचिवपदी केदार भोपे व खजिनदारपदी दैनिक प्रभातचे रवींद्र कदम यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेची नुकतीच बैठक झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डॉ. राहुल जैन-बागमार होते. ज्येष्ठ पत्रकार अशोकराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोनवणे यांनी संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. ती अशी ः जिल्हाध्यक्ष- बाबासाहेब ढाकणे (नगर रिपोर्टर), उपाध्यक्ष- सागर कोकणे (आयबीएन लोकमत), सचिव- केदार भोपे (दैनिक पुढारी), खजिनदार- रवींद्र कदम (दैनिक प्रभात), जिल्हा कार्यकारिणी सदस्य- गोरक्षनाथ बांदल, बबलू शेख, लहू दळवी, समीर दाणी, पंढरीनाथ पगार, बाबा मनियार, विठ्ठल शिंदे, मुरलीधर तांबडे, तेजस शेलार, प्रकाश साळवे, नारायण पालवे.
यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. तसेच हे प्रश्‍न सोडविण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button