अहमदनगर

महाविकास आघाडी सरकार दारुड्यांच्या पाठीशी

मनसेच्या वतीने आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालत केला निषेध   

अहमदनगर : करोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र आघाडी सरकारने घरपोहच दारू विक्री करण्यास परवानगी दिल्याने महाविकास आघाडी सरकारचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी आघाडी सरकारचा  पुतळा तयार करून त्याला दारूने अभिषेक घालण्यात आला.  

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे समवेत उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले कपड्याच्या दुकान, किराना, मोबाइलच्या दुकान, ऑटोमोबाईल, भाजी मार्केट या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार आज दोन ते तीन महिने झाले त्यांना पगार नाही त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री करायची सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये 10 हाजार रिक्षावाले आहे. त्यांना फक्त 500 रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे. व बँक फायनान्स कंपनी यांच्या हप्ते भरायला सुद्धा सर्वसामान्य नागरिक व्यापारी कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीं. आणि कुठल्या प्रकारचे बँक वाले थांबत नाही. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत सरकारचा मनसेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button